किनगाव येथे पेट्रोल पंपासमोर अपघात : 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Accident in front of petrol pump in Kingaon: 22-year-old youth dies यावल (30 मे 2025) : यावल तालुक्यातील किनगाव येथील मयुरी पेट्रोल पंपासमोरून सायकलव्दारे 22 वर्षीय तरुण हा आपल्या घरी जात अज्ञात वाहनाने घडक दिली होती यात तो गंभीर जखमी झाला होता तेव्हा त्याला उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगाव या गावातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर मयुरी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर गणेश भास्कर धनगर (22) हा तरुण सायकल घेऊन घरी जात होता. दरम्यान त्याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडके गणेश धनगर हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात भास्कर तुळशीराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.