गिरडगाव येथील 52 वर्षीय इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
यावल (30 मे 2025) : यावल तालुक्यातील गिरडगाव या गावातील रहिवासी एका 52 वर्षीय इसमाने गिरडगाव शिवारातील नाक्यावरील शेतातील विहिरीत उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि विहिरीतून सदर इसमाला काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. ही घटना सोमवारी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप उत्तम पाटील (52) असे मृताचे नाव आहे.
दरम्यान, हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रवींद्र विक्रम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे.





