धुळे रेस्ट हाऊसमधील पावणेदोन कोटींचे घबाड प्रकरण : स्वीय सहाय्यक किशोर पाटलासह तिघांविरोधात गुन्हा


Dhule Rest House scam worth Rs 2.5 crore: Case filed against three including personal assistant Kishor Patal धुळे (31 मे 2025) : राज्यात गाजत असलेल्या धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरणात स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह तिघांविरोधात कलम 124 महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
धुळे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेल्या 11 आमदारांच्या अंदाज समितीला देण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये गुलमोहोर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे व पदाधिकार्‍यांनी केला होता. खोलीची झडती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावे म्हणून चार तास ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. अखेर चार तासांनी वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर खोलीची झडती घेतल्यानंतर त्यात तब्बल एक कोटी 84 लाख रुपये सापडले होते. या रकमेवर कुणीही दावा केला नसल्याने ही रक्कम कुणाची? असा प्रश्नही निर्माण झाला होता मात्र माजी आमदार गोटे यांनी समितीला देण्यासाठीच ही रक्कम गोळा केल्याचा दावा केला होता.





स्वीय सहाय्यकाचे निलंबन
राज्यात गाजलेल्या या प्रकरणात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते व त्यांनी धुळे शहर सोडून जावू नये, असे आदेशही पोलिसांनी दिले होते.

तीन संशयीतांविरोधात गुन्हा
धुळे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ दिवस धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल दिला. याप्रकरणी स्वीय सहाय्यक किशोर पाटील व राजू मोगरे व अन्य एकाविरोधात कलम 124 महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत गुन्हा धुळे शहर पोलिसात (गुन्हा क्रमांक 264/25) दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात पुढे आणखी जे निष्पन्न होईल त्या पद्धत्तीने कलमे वाढवण्यात येणार आहेत शिवाय या प्रकरणाचा आयकर विभाग देखील स्वतंत्र तपास करीत आहे.

काय आहे कलम 124
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (मुंबई पोलीस कायदा) मधील कलम 124 मालमत्तेच्या बेकायदेशीर मालकीशी संबंधित आहे. ज्याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही. या कलमांतर्गत, जर कुणी व्यक्ती अशा मालमत्तेची मालकी करत असेल आणि तिच्या मालकीबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नसेल तर त्याला शिक्षेची त्यात तरतूद आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !