तंबाखूच्या मागे मेंदूचं भावनिक गणित काय सांगतं?

तोंडातून तंबाखू गुटखा काढण्यापेक्षा, मनातून त्याची गरज काढून टाका : तो गरज वाटतोय, हेच सर्वात मोठं व्यसन : प्रसिद्ध मानसशास्त्रीय समुपदेशक निलेश गोरे,


भुसावळ (31 मे 2025) : तंबाखू गुटखा हे केवळ शरीराचं व्यसन नाही, ते मनाला गाठणारं एक सुसंस्कृत जाळं आहे आणि त्यातून सुटणं म्हणजे केवळ सवय सोडणं नाही, तर एक मानसिक क्रांती घडवणं आहे! आज 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त आज आपण अत्यंत खोलात जाऊन बाहेर काढणे हे जाणून घेऊया की तंबाखू आणि गुटखा खाण्याचे सवय का लागते त्याच्यामागे काय आपली मानसिकता असते आणि ती सोडण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत.

अनेक वापरकर्ते तंबाखूला तनाव निवारक, एकांत साथीदार, किंवा एकाग्रतेचं साधन मानतातपण प्रत्यक्षात ही सवय भावनिक कमकुवतपणाची प्रतिक्रिया असते.





गोरे यांचं निरीक्षण स्पष्ट आहे: माणूस जेव्हा स्वतःच्या भावनांशी संवाद साधू शकत नाही, तेव्हा तो बाह्य ‘क्रच’कडे वळतो – आणि तंबाखू त्यात अगदी सहज बसतो.

मानसशास्त्रीय गैरसमज : जे तंबाखूचा मुखवटा अधिक घट्ट करतात

या 3 मुख्य गैरसमजांमुळे सवय टिकते

1. मला काही होत नाही, मी फिट आहे

ही इल्युजन ऑफ इन्विन्सिबिलिटी ः म्हणजे माझं काही बिघडणार नाही अशी अपुरी समज

पण मानसशास्त्र सांगतं, अशा विचारांचं मूळ हे फिअर डेनियलमध्ये असतं.

2. तणाव कमी होतो

वस्तुत ः, तंबाखू केवळ तात्पुरती -ीींंशपींळेप डहळषीं देतो.
तणावाचं मूळ कारण अनसुलझंच राहतं.

3. नंतर सोडेन

हे कामचुकारपणाचा पक्षपात

श्री. गोरे सांगतात, आजचा निर्णय लांबवणं म्हणजे उद्याच्या नुकसानासाठी आजची परवानगी देणं.

तंबाखू सोडणं म्हणजे सवय बदलणं नाही ः ती एक ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे

समुपदेशक गोरे यांचा दृष्टिकोन असा की, व्यसनमुक्ती ही फक्त सवय न तोडता, त्या व्यक्तीची आत्मओळख, स्वतःचा स्वाभिमान आणि मानसिक शक्ती यांचा पुनर्निर्माण आहे.

ते सांगतात, माझ्याकडं येणारा अनेक वेळा म्हणतो, ‘मी खूप वेळा सोडायचा प्रयत्न केला आहे, पण नाही जमत.’

मग मी त्याला विचारतो – ‘सोडताना तू स्वतःला काय नाव दिलंस? कमकुवत? हतबल? की प्रयत्नशील?’
उत्तरातच पुढचा मार्ग असतो.

तंबाखू सोडण्यासाठी मानसिकदृष्ट्या काय करायला हवं?

मानसशास्त्रीय समुपदेशक निलेश गोरे यांच्या मते ः तंबाखू सोडणं म्हणजे केवळ सवय मोडणं नाही, ती एक मानसिक लढाई आहे.

प्रभावी उपाय

1. स्वतःला ओळखा – मी का खातो?

कारण समजलं की उपचार सहज होतो. भावनिक कारण असेल तर समुपदेशन गरजेचं.

2. वैकल्पिक कृती शोधा

तंबाखूची इच्छा झाली की थेट दुसरी कृती – विलायची, सोफ , ओवा, धन्याची डाळ खा किंवा पाणी प्या किंवा चालायला जा. चालल्याने फोकस शिफ्ट होऊन रिलीफ मिळते.

3. मनाची सकारात्मक पुनर्रचना

तंबाखू हवी आहे हे विचार बदलून माझं आरोग्य हवं आहे या दिशेने वळवणं.

4. समुपदेशन आणि गटचर्चा

अनुभवी समुपदेशकांकडून घेतलेल्या उपचारांचा फायदा होतो.

5. फॅमिलीचा सपोर्ट आणि सामाजिक पाठिंबा

घरच्यांनी दोष न लावता पाठिंबा द्यावा – बाहेर पडूया यातून एकत्र!

तंबाखूवर विजय हवा? मग सुरुवात ‘मनापासून’ करा !

समुपदेशक श्री. निलेश गोरे म्हणतात : तोंडातून तंबाखू गुटखा काढण्यापेक्षा, मनातून त्याची गरज काढून टाका. तो गरज वाटतोय, हेच सर्वात मोठं व्यसन आहे!

निलेश गोरे
वेलनेस काऊंसलिंग/समुपदेशन केंद्र, भुसावळ
मो.8999416770





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !