अंजाळेनजीक ट्रॅक्टर दरीत कोसळले : ट्रॅक्टर चालक ठार


Tractor falls into ravine near Anjale : Tractor driver killed यावल (1 जून 2025) : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ भुसावळकडून यावलकडे येतांना अंजाळे बस स्थानकाच्या अलीकडील चढावावर गुरुवारी सकाळी खडी घेवुन जाणारे ट्रक्टर अनियंत्रीत होत दरीत कोसळले होते. यात चालक ट्रॅक्टरखाली दबला जावून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी चालकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला कठडे व संरक्षण भिंतीमुळेच चालकास प्राण गमवावे लागल्याने अंजाळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने दरीत कोसळले
भुसावळकडून यावलकडे गुरुवारी सकाळी ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. 19 सी. जे. 1247) यामध्ये खडी भरून ट्रॅक्टर चालक छगन गोमा सपकाळे (45, रा.कठोरा, ता.यावल) हे येत होते. अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुढे अंजाळे गावाच्या बसस्थानकावर येत असताना चढाव आहे. या चढावावर अचानक समोरून एक वाहन आल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने आपली गती कमी केली. गती कमी केल्यामुळे ट्रॅक्टर अनियंत्रित झाले. चढावावरून ते मागच्या दिशेने रिव्हर्स झाले. त्यावर नियंत्रण मिळवण्या आधीच ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळले. या अपघातात ट्रक्टर चालक सपकाळे हे ट्रॅक्टर खाली दाबले गेले. गावातील धनराज सपकाळे, धीरज सपकाळे, कांचन बाविस्कर सह तरुणांनी पुढाकार घेऊन तब्बल तीन तासानंतर या ट्रॅक्टरच्या धुळला बाजूला उचलून चालक छगन सपकाळे यांना तिथून बाहेर काढून भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारर्थ दाखल केले होते. दरम्यान शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या चढावावर या रस्त्याच्या कडेला कठळे असते किंवा सरंक्षण भिंत असती तर सपकाळे यांचा जीव वाचला असता अशी संतप्त भावना अंजाळे गावातुन उमटत आहे. मयत सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !