दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल भदाणे यांची नऊ महिन्यात उचलबांगडी : नूतन अभियंतापदी राजेश मोराळे

Deepnagar Center Chief Engineer Praful Bhadane was removed from his post within nine months: Rajesh Morale appointed as the new engineer भुसावळ (1 जून 2025) : दीपनगर औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांची अवघ्या नऊ महिन्यांत मुख्य अभियंता पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी पदभार घेतला होता. अत्यल्प कालावधीत त्यांची मुख्यालयातील सीपीए विभागात बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी नाशिक औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांची बदली असून ते पदभार स्विकारणार आहेत.
अवघ्या नऊ महिन्यात बदली
दीपनगर औष्णिक केंद्रात ऑगस्ट 2024 मध्ये मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागी उरण केंद्रातील उपमुख्य व प्रभारी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांची बदली झाली होती. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न करताच अवघ्या नऊ महिन्यात महानिर्मितीच्या मुख्यालयात उचल बांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नाशिक औष्णिक केंद्रातील मुख्य अभियंता राजेश मोराळे पदभार स्विकारणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात तरी दिपनगर केंद्रातील प्रदूषणाचे प्रश्न सुटतील, अशी आशा आहे.