चाळीसगाव तालुका हादरला : पत्नीला गळफास देत पतीचीही आत्महत्या
हातगावातील शिवारातील प्रकरण : मयत पतीविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा
Chalisgaon taluka shaken: Husband also commits suicide by hanging his wife चाळीसगाव (2 जून 2025) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली व नंतर स्वतःदेखील गळफास घेतल्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेनंतर घडला. वर्षा विजय चव्हाणके (40, हातगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे तर विजय सुखदेव चव्हाणके (45, हातगाव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
मृताचा लहान भाऊ विजय सुकदेव चव्हाणके याने याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार पत्नी वर्षा विजय चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा दोरीने गळा आवळून खून केला व विजय याने स्वतः सुद्धा शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्यावरून मृताविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.
अधिकार्यांची धाव
खुनाची माहिती मिळताच चाळीसागाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरूळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहूल राजपूत, हवालदार ओंकार सुतार व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली.