अट्रावल शिवारात शेतात काम करत असतांना शेतमजुराला सर्पदंश
Ahilyadevi Holkar’s work is inspiring : Minister Sanjay Savkare यावल (2 जून 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल या गावाच्या शेतशिवारामध्ये रविवारी 45 वर्षीय इसम काम करत असतांना त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. अट्रावल गावातील शेतशिवारामध्ये अतुल शांताराम महाजन (45) हा इसम रविवारी शेतात काम करत होता.
केळीच्या शेतात काम करत असतांना त्याच्या उजव्या पायाला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.ऋषभ पाटील, अधिपरिचारिका दीपाली किरंगे, कादर तडवीसह आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.







