बांगलादेश युवती घुसखोरी प्रकरण : दाम्पत्याच्या कोठडीत वाढ
Bangladeshi girl infiltration case : Couple’s custody extended भुसावळ (2 जून 2025) : बांग्लादेशातून कलकत्ता व तेथून मुंबईत जाण्यापूर्वीच दोन बांगलादेशी तरुणींना भुसावळात पकडण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी पुण्यातील कोंडवा येथील शिवनेरी भागातून पती-पत्नीच्या मुसक्या आवळल्या होत्या. याा पती-पत्नीची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना न्यायालयाचा हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.
बनावट आधारकार्डमुळे फुटले बिंग
शहरातील एका लॉजमध्ये या तरुणी मुक्कामासाठी खोली घेत असताना लॉज मालकाला आधार कार्डाचा संशय आल्याने तरुणी बांगलादेशातील असल्याचे समोर आले. तानिया मुळाशीर अहमद (26, रा.उतरफान हातिपाडा, जिल्हा ढाका, बांगलादेश) व करीमा बोकुलमिया अख्तर ( 22, रा.मोहरीच्या कन्नय्या नगर, बाव्हम बरिया, बांगलादेश) अशी अटकेतील तरुणींची नावे आहेत. पोलिसांनी तपासादरम्यान पुण्यातील कोंडवा भागातील शिवनेरी परिसरातून रंगा देवअप्पा अरकरी (45) व कुलमणी रंगा अरकरी (36) या दाम्पत्याला अटक केली होती. पत्नी पश्चिम बंगालची व पती कर्नाटकचा रहिवासी आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे.

पश्चिम बंगालचे पथक येणार
भुसावळात पकडण्यात आलेल्या तरुणींना सहकार्य करणारे मुख्य संशयित हे पश्चिम बंगाल राज्यातील असून त्यांना पकडण्यासाठी बाजारपेठ पोलिसांचे एक अधिकारी व तीन हवालदाराचे पथक रवाना झाले आहे. मुख्य संशयीतांच्या अटकेनंतर बेकायदेशीरित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशींचा अधिक खुलासा होणार आहे.




