घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत सव्वा लाखांचा ऐवज लांबवला


Thieves took advantage of the house being locked and stole property worth Rs. 1.25 lakh जळगाव (3 जून 2025) :  घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत दागदागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज लांबवला. ही घटना पिंप्राळ्यात घडली. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
नरेंद्र दौलतराव वाघे (रा.मारोती पार्क, पिंप्राळा शिवार, जळगाव) हे त्यांच्या पत्नीसह मुलीकडे ऑस्ट्रेलिया या देशात गेले आहेत. 1 जून रविवारी रोजी सकाळी 9 वाजता नरेंद्र वाघे यांनी त्यांचे पाहुणे लीलाधर शांताराम खंबायत (वय 51, रा. पार्वती काळे नगर, जळगाव) यांना फोन करून सांगितले की, घराचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तुम्ही घरी जाऊन पहा. त्यानुसार लिलाधर खंबायत यांनी घरी जाऊन पाहिले असता वाघे यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर काढून नेल्याने दिसून आला नाही.

घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानुसार लीलाधर खंबायत यांनी साडू नरेंद्र वाघे यांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. घरातील सोन्याची चैन व अंगठ्या असा सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला असून लिलाधर खंबायत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !