कोथळी उड्डाणपूलावर भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळली : दोघे जागीच ठार, 24 प्रवासी जखमी


Speeding train hits truck on Kothali flyover: Two killed on the spot, 24 passengers injured मुक्ताईनगर (4 जून 2025) : जिल्ह्यात अपघाताची मालिका कायम असून मुक्ताईनगराजवळील कोथळी उड्डाणपूलावर सुरतकडून बुलढाण्याच्या दिशेने निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर 24 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. देविलाल पन्नालाल असे एकाचे नाव असून अन्य दुसर्‍याचे नाव कळू शकले नाही.

असा घडला अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांना घेवून सुरतहून बुलढाण्याच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स कोथळी उड्डाणपुलावरून जात असताना पुढे चालत असलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघातात ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर 15 ते 20 प्रवाशी जखमी झाली. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !