धुळ्यासह मालेगावातून दुचाकींची चोरी : चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात
चोरीच्या तीन दुचाकी जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दुचाकी चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. एकवीरा देवी मंदिराजवळील पांझरा नदी काठी संशयीत रती हा चोरीची दुचाकी विक्रीच्या प्रतीक्षेत असताना पथकाने त्यास पकडले. आरोपीने धुळ्यातील नकाणे रोड, बिजली नगर भागातून पाच महिन्यांपूर्वी दुचाकी चोरी केल्याची कबुली देत मालेगावातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून पश्चिम देवपूर हद्दीत चोरी झालेल्या दुचाकी चोरीचा उलगडा झाला असून अन्य स्प्लेंडर व अॅक्टीव्हा वाहनाबाबत माहिती संकलीत केली जात आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.
