मजुरांची वाहतूक करणारी पिकअप पाल घाटात उलटली : एक ठार, 22 जखमी


Pickup truck transporting laborers overturns in Pal Ghat : One dead, 22 injured रावेर (5 जून 2025) : सावद्याकडून पालकडे मजुरांना नेणारी पिकअप पाल घाटातील गारबर्डी गावाजवळ उलटून झालेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर अन्य 22 जखमी झाले. हा अपघात बुधवार, 4 जून रोजी रात्री घडली. अनिल उर्फ अरविंद माका बारेला (19, रा.मलगाव कोठा, ता.जिरण्या जि.खरगोन, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

रोजंदारी मजुरांवर कोसळले संकट
फैजपूर येथे मलगाव कोठा गावचे काही मजूर हे मजुरी काम करण्यासाठी आले होते. काम आटोपल्यानंतर परत गावी जाण्यासाठी बुधवार, 4 रोजी रात्री 8 वाजता ते गावाकडे निघाल्यानंतर रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ असलेल्या एका घाटामध्ये त्यांची भरधाव पिकअप चालकाचा ताबा सुटल्यामुळे उलटली. रात्रीच्या अंधारामध्ये कोणाला काहीच समजले नाही मात्र आजूबाजूच्या ग्रामस्थांना घटना कळताच त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार मिळेल त्या वाहनाने जखमींना पाल येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तर सात जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अनिल बारेला याचा मृत्यू झाला. अनिल बारेला याच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. अनिल बारेला याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.




अपघातातील जखमी असे
चालक धरम नरोम सिसोदिया (20), भुरीबाई नवा बारीला (18), लाडकीबाई रीछू भिलाला (30), नुस्तीबाई रिछू भिलाला (55), सुमलीबाई प्रेमसिंग बारेला (50), लक्ष्मी सोमसिंग बारेला (16), शेवता वेसासिंग बारेला (25), रूपा कालू बारेला (16), दयाराम कालू बारेला (20), पार्वती मधू बारेला (12), सविता रामदास बारेला (14), आशा मधू बारेला (16), विकास वेचता बारेला (15), हिरालाल गोरालाल बारेला (30), सुभान कीछू बारेला (32), सुरेश चेनसिंग भिलाला (18), विजय अशोक बारेला (15), सायली होवळसिंग बारेला (15), रंजीता संजू बारेला (14), भुरी गोडा बारेला (18), रघुवीर कालू बारेला (18, सर्व रा.कोठा, ता.झिरण्या, जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !