भुसावळ तहसील कार्यालयातून ट्रक पळवणार्‍या आरोपीस एक वर्ष शिक्षा


Accused of stealing truck from Bhusawal Tehsil office gets one year in prison भुसावळ (5 जून 2025) : तहसील कार्यालयाने जप्त केलेला ट्रक पळवून नेणार्‍या आरोपीस भुसावळ न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

असे आहे नेमके प्रकरण
6 जुलै 2021 रोजी महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्रमांक एम.एच.19 झेड.0931) जप्त करीत तहसील आवारात लावला होता. आरोपी गणेश बळीराम कोळी (25, रा.जवाई नगर, बांभोरी, ता.धरणगाव, जि. जळगाव) याने रात्रीच्या वेळी हा ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाईट ड्युटीवर असलेले अधिकारी मोहम्मद अली सय्यद व त्यांच्या सहकार्‍यांनी सतर्कता दाखवत ट्रक आणि आरोपीस पकडून पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी सकाळी तहसीलदार, भुसावळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद सय्यद यांनी केला. त्यांच्या तपासानंतर आरोपीविरुद्ध भुसावळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.एल.आर.पावरा आणि आरोपीतर्फे अ‍ॅड.डी.ए. कश्तरीया यांनी बाजू मांडली. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजारांचा दंड सुनावला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !