छळापुढे हात टेकत एरंडोल शहरात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल : पतीसह चौघांविरोधात गुन्हा


Facing harassment, a married woman in Erandol city took extreme measures: A case was registered against four people including her husband. एरंडोल (5 जून 2025) : शहरातील पोस्ट गल्लीतील भागातील 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्यची घटना बुधवारी रात्री 12 वाजेनंतर घडली. सासरच्या लोकांनी छळ केल्याने तसेच चारित्र्यावर संशय घेतल्यानेच विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केल्यानंतर पतीसह चौघांविरोधात एरंडोल पोलिसात गुनह दाखल करण्यात आला. मनीषा सागर सोनार (35) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
मयत मनीषा ही पती सागर सोबत पुणे येथे वास्तव्यास होती. गेल्या वर्षभरापासून मनीषा ही पती व नऊ वर्षीय मुलासह एरंडोल शहरात वास्तव्यास आली. बुधवारी रात्री मनीषाने परिवारासोबत जेवण करून वरच्या मजल्यावर गेली, बराच वेळ झाला तरी मनीषा ही खाली न आल्याने मनीषाचा मुलगा आईला बघायला वर गेला विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी रवाना केला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी एरंडोल गाठत एकच हंबरडा फोडला. मुलीचा चारित्र्याच्या संशयातून छळ करण्यात आला तसेच शारीरीक व मानसिक छळ करण्यात आल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटूंबियांनी केल्यानंतर पोलिसांनी मृताचा पती, सासु, जेठानी व जेठ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !