धुळे रेस्ट हाऊसमधील घबाड प्रकरण : पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पूर्ण


Dhule Rest House incident : Police completes examination of CCTV footage धुळे (6 जून 2025) : धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत तब्बल एक कोटी 84 लाखांचे घबाड सापडल्यानंतर पोलिसांनी तपासात वेग घेत आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणी आता विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी पूर्ण केली असून तपासणीत नेमके काय आढळले ? याचा तपशील कळू शकला नाही.

काय आहे प्रकरण
धुळे दौर्‍यावर आलेल्या विधी मंडळ अंदाज समितीला देण्यासाठी पाच कोटी रुपये जमवल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी करीत आंदोलन केले होते. अधिकार्‍यांच्या उपस्थितीत 102 क्रमांकाची खोली उघडल्यानंतर त्यात तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांचे घबाड सापडले होते.




ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांनी बुक केल्याची तक्रार होती. या घटनेला बुधवारी 15 दिवस झाले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी निलंबित किशोर पाटील, मंत्रालयीन कर्मचारी रामकुमार मोगले व अन्य एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र स्वरूपाची तक्रार दाखल केली असून पोलीस चौकशीत 16 मे रोजी खोली बुक झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे पोलिसांनी गुलमोहोर विश्रामगृह परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज व फाईल जप्त केल्या.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या दालनात विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पूर्ण करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !