भुसावळ शहरातील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू


A young man in Bhusawal city died of electric shock. भुसावळ (6 जून 2025) : शहरातील घोडेपीर बाबा रोडवरील मोरया हॉलमागील रहिवासी भारत सुरेंद्र शर्मा (24) या तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता घडली. भारत हा सुरेंद्र शर्मा यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो देखील वडिलांप्रमाणेच इलेक्ट्रिकचे काम करत होता. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

विजेचा शॉक लागताच मृत्यू
गुरुवारी सकाळी भारतचे वडील सुरेंद्र शर्मा यांनी भारतला त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले होते मात्र अगोदर काम पूर्ण करतो आणि मग जातो, नाहीत र तुम्ही घेऊन जा, असे भारतने सांगितले. यानंतर भारत मोरया मंगल कार्यालयासमोर एका टपरीत वायरिंगचे काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


भारत याला दोन बहिणी असून त्यापैकी एकीचा विवाह झाला आहे. त्याचे वडीलही इलेक्ट्रिकच्या कामातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तरुण आणि कमावत्या मुलाच्या अशा अचानक जाण्याने शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्र मंडळी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. भारतचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, जिथे विच्छेदन करण्यात आले. या करणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !