जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : दोन गावठी कट्ट्यांसह एमपीतील संशयीत जाळ्यात
Jalgaon Crime Branch’s performance : Two village gangs along with a suspect from MP caught in the net जळगाव (9 जून 2025) : जळगाव गुन्हे शाखेने एमपीतील दोन संशयीतांना दोन गावठी कट्टे विक्रीसाठी आणताना पकडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दूरक्षेत्राजवळील जंगल परिसरात संशयीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून दुचाकी (एम.पी.10 झेड.सी.9650) वर निळी पगडी घालून आलेला तसेच दुचाकी (एम.पी.10 एम.व्ही.1462) वर एक संशयीत येत असताना पोलिसांना पाहून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पाठलाग करून पकडले. आरोपींच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आली. गोविंदसिंग ठानसिंग बर्नाला (45, रा.सिरवेल महादेव, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) आणि निसानसिंग जिवनसिंग बरनाला (23, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, ह.मु. सिरवेल महादेव, ता.भगवानपुरा, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, गोपाळ गव्हाळे, नितीन बाविस्कर, बबन पाटील, चालक हवालदार दीपक चौधरी आदींच्या पथकाने केली.




