जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : तलवार, कोयता बाळगणार्‍या तरुणाला अटक


Jalgaon Crime Branch action: Youth carrying sword and sickle arrested जळगाव (10 जून 2025) : तलवार आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणार्‍या एकाला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवड येथे ही कारवाई केली. पुरुषोत्तम श्रावण वंजारी (26, रा.माळी वाडा, बोदवड) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणार्‍या रस्त्यावर एकजण हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथक रवाना झाले. पथकाने बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणार्‍या रस्त्यावरून संशयीत पुरुषोत्तम श्रावण वंजारी (26, रा.माळी वाडा, बोदवड) याच्या ताब्यातून तलवार आणि कोयता जप्त केला.

यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार प्रीतम पाटील, पोलीस अंमलदार रवींद्र चौधरी, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !