यावल-भुसावळ रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन पकडले


Vehicle transporting illegal timber caught on Yaval-Bhusaval road यावल (11 जून 2025)  : यावल-भुसावळ रस्त्यावर गस्ती वन विभागाच्या पथकाने अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल-भुसावळवरून सोमवारी मध्यरात्रीनंतर पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.19 ए.जी.3157) यातून अवैधरित्या लाकडाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वाहनांची वनविभागाच्या पथकाने तपासणी केली असता त्यात निंब, बाभुळ जळाऊ लाकूड मिळून आले. वाहन चालकाकडे लाकुड वाहतूक पास तथा परवाना नव्हता. लाकुड व वाहन असा एकूण एक लाख 45 हजार 854 रुपयाचा मुद्देमाल पंचनामा करून वनविभागाने जप्त केला. संपूर्ण मुद्देमाल यावल वन उपज केंद्रात जमा करण्यात आला. वाहन मालक व चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !