शिरसाड गावातील 36 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
36-year-old youth from Shirsad village commits suicide by hanging यावल (11 जून 2025) : यावल तालुक्यातील शिरसाड गावातील 36 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. तातडीने त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निलेश सुधाकर सोनवणे (36) असे मृताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
निलेशने आपल्या घरात लाकडी आड्याला बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसांना रवींद्र सोनवणे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सोनवणे करीत आहे.

