जळगाव रेल्वे स्थानकावर संशयीतरित्या फिरणाऱ्या पानेवाडीच्या युवकाला अटक


जळगाव (12 जुन 2025) : ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने जळगाव रेल्वे स्थानकावर फिरत असलेल्या एका संशयित युवकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात त्याच्या विरूध्द लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावर दि. १० जून रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सकाळी १२.०५ वाजता गाडी क्रमांक ११११३ अप येत असताना आरपीएफचे उपनिरीक्षक मोहित कुमार, जे. पी. झाल्टे आणि मनोज मौर्या हे गस्त घालत असताना त्यांना एक युवक संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यांची चौकशी केली असता, त्याने नाव अविनाश वसंत काले (वय २६, राहणार पानेवाडी, मनमाड, जि. नाशिक) असे सांगितले. या युवकाला दुपारी लाेहमार्ग पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला. आरपीएफच्या ऑपरेशन यात्री सुरक्षा मोहिमेअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !