भुसावळ रेल्वे स्थानकावरील मुसाफिर खान्यातून प्रवाशाची बॅग लांबवली


भुसावळ (12 जुन 2025) : रेल्वे स्थानकावरील मुसाफिर खान्यात झाेपलेल्या एका प्रवाशाची बॅग चाेरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी दि. १० राेजी रात्री घडली. या बॅगेत माेबाईल व ४५ हजार रूपये राेख हाेते, याप्रकरणी लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात अनाेळखी चाेरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चाेरटा रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या मुसाफिर खान्यात रात्रीच्या वेळी प्रवासी आराम करीत असल्याने याचा फायदा घेत, चाेरट्याने एका प्रवाशाची बॅगच चाेरून नेली, या बॅगेत माेबाईल व ४५ हजार रूपये राेख हाेते. चाेरट्याने प्रवासी झाेपल्याची संधी साधत चाेरी केली, याप्रकरणी प्रवाशांने लाेहमार्ग पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे.


पाेलिसांकडून रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेचची पहाणी केली जात आहे. संशयीताची माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे, लवकरच संशयीताच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास निरीक्षक सुधीर धायरकर यांनी व्यक्त केला. पाेलिसांकडून संशयीताचा शाेध घेण्याचे काम सुरू केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !