धुळे जिल्हा पोलिस दलातील नऊ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या

Transfers of nine police officers in Dhule District Police Force धुळे (12 जून 2025) : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी धुळे जिल्हा पोलिस दलातील नऊ अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. नव्यानेच रूजू झालेल्या दोन पोलिस अधिकार्यांना पोलिस ठाणे मिळाले असून अन्य सात अधिकार्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.
नूतन अधिकार्यांना मिळाले पोलीस ठाणे
नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक दीपक रमेश वळवी व पोलिस निरीक्षक समाधान महादू वाघ यांना अनुक्रमे साक्री पोलिस ठाणे व देवपूर पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे.

सात अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या
धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मोहाडी पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती देण्यात आली तर टीएमसी सेलचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याकडे धुळे शहर वाहतूक शाखेची धुरा सोपवण्यात आली आहे.
देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे धुळ्यातील तालुका पोलिस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली. देवपूरला आता निरीक्षक समाधान वाघ प्रभारी असतील.
पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांची सोनगीर येथे बदली करण्यात आली तर सोनगीर प्रभारी सचिन कापडणीस यांची पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
धुळे तालुक्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक दत्तु धनवटे यांची क्यूआरटी/आरसीपी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली तर मोहाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन मुंडे यांची धुळे एलसीबीला नियुती करण्यात आली.
बदली झालेल्या अधिकार्यांनी तातडीने नवीन ठाण्याचा पदभार घेवून अनुपालन अहवाल सादर करावा, असे जिल्हा पोलिसांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे.
