अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

एपी वृत्तसंस्थेचा दावा : देश शोकसागरात : बॉलिवूड सेलिब्रेटींनी रद्द केले सर्व कार्यक्रम


All 242 passengers killed in Ahmedabad plane crash अहमदाबाद (12 जून 2025) : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली होती. या विमानत क्रू मेंबरसह एकूण 242 प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत ते खाली कोसळल्यानंतर विमानाला आग लागून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा एपी न्यूजने केला आहे. गुजरामधील पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेने दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते. एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाईनर 787 हे विमान अहमदाबादवरुन लंडनकडे निघालं होतं. दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं. विमानाने हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळले



या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत..

एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बी.जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले. हॉस्टेलवर जेवण करणार्‍या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरुन उठवण्याचं काम ह्या दुर्घटनेनं केलं. या दुर्घटनेत येथील 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे.

 

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !