अहमदाबाद विमान अपघातात सुनील तटकरेंच्या नातेवाईकाचा मृत्यू


अहमदाबाद (12 जून 2025) : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती असून मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातलग असल्याची माहिती समोर आली आहे. क्रू सदस्या अपर्णा महाडिक असे त्यांचे नाव आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावले होते. या विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. पण त्यानंतर 3-4 मिनिटांतच ते एका नागरी इमारतीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यात एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे या दुर्घटनेत 242 जणांचा बळी गेला.



केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी
एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. त्यात 12 क्रू मेंबर्स व 230 प्रवासी होते. 12 एक क्रू मेंबर असणार्‍या अपर्णा महाडिक (कर्मचारी संख्या: 80008872) या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वतःही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तासांपूर्वी दिल्लीत लँड झालेत. त्यानंतर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले.

अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंघरे या 6 मराठी प्रवाशांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. पण त्यांची पुष्टी अद्याप झाली नाही. मैथिली पाटील (कर्मचारी संख्या: 80047429), दीपक पाठक (कर्मचारी संख्या: 81033187) व रोशणी सोंघरे (कर्मचारी संख्या: 80055146) हे तिघेजण अपर्णा महाडिक यांच्यासारखेच एअर इंडियाचे केबिन क्रू होते.

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू
अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांचा विमान प्रवासातील एक फोटोही समोर आला आहे. त्यात ते कोणत्या तरी कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !