पाचोरा तालुक्यात दुचाकी अपघातात तरुण ठार, दुसरा जखमी

वेरुळी खुर्द रस्त्यावरील घटना : एक जण गंभीर जखमी


Youth killed, another injured in bike accident in Pachora taluka पाचोरा (13 जून 2025) : पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरणाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली. भगवान सुभाष पाटील (38, वेरुळी खुर्द, ता.पाचोरा) असे मृताचे नाव आहे.

मयत भगवान पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. भगवान पाटील हे शेतातुन काम करुन घरी जात असताना वेरुळी कडुन वडगाव टेककडे जात असताना विकास मांगो यशवद (30, रा.वडगाव टेक, ता.पाचोरा) यांच्या मोटरसायकलने भगवान पाटील यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात भगवान पाटील यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास यशवद हे जखमी झाले आहेत. भगवान पाटील यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !