भुसावळात महिलेवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न : वाचवायला आलेल्या भाचावर चाकूने वार


Attempted knife attack on woman in Bhusawal: Nephew stabbed to death when he came to save her भुसावळ (13 जून 2025) : शहरातील आगाखानवाडा परिसरात एका महिलेवर हल्ला करून तिला वाचवायला आलेल्या तिच्या भाच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवार, 11 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
शहरातील एका भागातील 43 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयीत गुलाम (पूर्ण नाव माहित नाही), गुलाम दस्तगीर उर्फ पप्पू, व आवेश (दोघांचेही पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा.मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलजवळ) यांनी महिलेला ओढण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिलेने आरडा-ओरड केली असता तिचा भाचा साहील शेख मुशीर तिला वाचवायला आला. यावेळी संशयीताने चाकू काढून साहीलच्या डाव्या हातावर वार करून त्याला जखमी केले. यावेळी संशयीतांनी शिवीगाळ करत धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला. तपास निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे, जुबेर तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !