भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी : दोन चोर्‍या प्रकरणी तीन संशयीतांना बेड्या


Bhusawal Railway Protection Force performance: Three suspects arrested in two theft cases भुसावळ (13 जून 2025) : भुसावळ रेल्वे स्थानकावर यात्री सुरक्षा मोहिमेंतर्गत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांतर्फे कारवाईत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांतील एकूण तीन संशयीतांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि खबर्‍यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात चोरी करणार्‍यां गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

दोन चोर्‍या उघडकीस
रेल्वे स्थानकावर 8 जून रोजी भुसावळ स्थानकाच्या मुसाफिरखान्यात एका प्रवाशाचा बॅग चोरीस गेली होती. सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची ओळख पटल्यावर 11 जून रोजी नीलेश अढवाल, जोगेंद्र नेरपगार,महेंद्र कुशवाहा आणि प्रवीण लूले व बाबु मिर्झा यांनी संयुक्त कारवाई करून नगरपालिकेजवळील परिसरातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे संदीप पुरूषोत्तम कांबळे (19, रा.गार्ड लाईन, भुसावळ) व शेख इब्राहीम शेख नूरबेग (30, रा.मिल्लत नगर, भुसावळ) सांगितली. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून पेालिसांनी 39 हजार 999 रुपयांचा मोबाईल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला


चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासातच पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावला, पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दुसर्‍या घटनेत अहमदाबादच्या व्यक्तीकडून मोबाईल जप्त
बुधवारीच दुसर्‍या घटनेत ड्युटीवर असलेले आरपीएफ महेंद्र कुशवाहा, भूषण पाटील आणि विशाल चौधरी, बाबू मिर्झा यांनी भुसावळ स्टेशनच्या मुसाफिरखान्यात सायंकाळी साडेपाच वाजता संशयास्पद अवस्थेत फिरणार्‍या एका प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव संजय प्रभाकर पंसारी (59, रा. इंदिरा कॉलनी रोड, अहमदाबाद, गुजरात) असे सांगितले. झडती घेतल्यावर त्याच्याकडून एक सुमारे 16 हजार रुपये किंमतीचा मोबाईल सापडला. चौकशीत त्याने तो मोबाइल मुसाफिरखान्यात झोपलेल्या प्रवाशाच्या पँटच्या खिशातून चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

स्थानक परिसरात सुरक्षा वाढवली
या दोन घटनांनंतर आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची मुसाफिरखान्यासह संपूर्ण स्टेशन परिसरात गस्त आणि देखरेख वाढवली आहे. प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !