रावेर तालुका हादरला : मुलीला शॉक लागताच वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पित्याचाही दुर्दैवी मृत्यू


Raver taluka shaken: Father who came forward to save daughter after she went into shock also dies tragically रावेर (13 जून 2025) : उघड्या वीज तारांचा शॉक मुलीला बसल्यानंतर मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या पित्याचाही शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रावेर तालुक्यातील तासखेडा येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. समाधान तायडे (36) व मानवी समाधान तायडे (9) अशी मयत पिता-पूत्रींची नावे आहेत.

दोघांचा एकाचवेळी मृत्यू
शुक्रवारी सकाळी उघड्या जिवंत विजेच्या ताराला मुलगी मानवीचा स्पर्श होताच मुलीला वाचविण्यासाठी वडील समाधान तायडे हे धाऊन गेले असता त्यांनाही विजेचा जबर झटका बसला. अत्यवस्थ अवस्थेत दोघांना भुसावळातील ट्रामा केयर सेंटरला हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.


समाधान तायडे हे केळी व्यवसाय करून आपला उदर निर्वाह करत होते. पिता-पूत्रीच्या मृत्यूने तासखेडा गावावर शोककळा पसरली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !