अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

Black box of plane that crashed in Ahmedabad found अहमदाबाद (13 जून 2025) : अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी अपघात घडल्यानंतर अपघाताची नेमकी घटना कशी घडली ?यावर मंथन सुरू आहे. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांसह एकूण 265 जणांचा मृत्यू झाला असून डीएनएद्वारे मृतांची ओळख पटवली जात आहे.
दरम्यान, विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स इमारतीच्या छतावर सापडला आहे. अपघाताच्या तपासात एनआयएसह सात एजन्सी सहभागी आहेत.

265 मृतदेह सापडले
अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचे मृतदेह सापडले आहेत. यापैकी 241 मृत विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स असून ज्या वैद्यकीय वसतिगृहात विमान कोसळले त्या वैद्यकीय वसतिगृहातील पाच मृत आहेत.
विमान कोसळले त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात 50 हून अधिक लोक उपस्थित होते. एमबीबीएसचे चार विद्यार्थी आणि एका डॉक्टरची पत्नी यांचा मृत्यू झाला तर 45 हून अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृहातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. गुजरात आयएमएचे अध्यक्ष डॉ. मेहुल शाह यांनी ही माहिती दिली.
माजी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटताच राजकोटमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचा मुलगा उद्या अमेरिकेहून परत येईल. पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे ते सुमारे 10 मिनिटे पीडितांना भेटले.
एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान एआय-171 गुरुवारी दुपारी 1.38 वाजता अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले. विमानात एकूण 230 प्रवासी होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटन, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. विमान अवघ्या दोन मिनिटांतच कोसळले. त्यापैकी 103 पुरुष, 114 महिला, 11 मुले आणि 2 नवजात बालके होती. उर्वरित 12 जण क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश होता, तर फक्त एकच प्रवासी बचावला.
डीएनएद्वारे मृतांची पटवली जात आहे ओळख
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचण्या केल्या जात असून एनएसजी टीम चौकशीसाठी विमान अपघातस्थळी पोहोचली आहे. ढिगार्याखाली दबलेल्या इतर वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिस स्निफर डॉगसह अपघातस्थळी दाखल आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी एअर इंडियाने अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आणि गॅटविक विमानतळांवर मदत केंद्रे उघडली आहेत. भारतासाठी, तुम्ही 1800 5691 444 वर संपर्क साधू शकता आणि भारताबाहेरून, तुम्ही 8062779200 वर संपर्क साधू शकता.
