अहमदाबाद विमान अपघात : एलआयसी क्लेम सेटलमेंट जलद करणार

Ahmedabad plane crash: LIC to expedite claim settlement अहमदाबाद (13 जून 2025) : विमान अपघाताने तब्बत 265 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर एलआयसीने आता मृताच्या नातलगांना क्लेम सेटलमेंट प्रक्रिया जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
एलआयसीने या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. शुक्रवारी या घटनेबाबत एक प्रेस रिलीज जारी करत एलआयसीने म्हटले की, आम्ही क्लेम सेटलमेंट प्रक्रिया शक्य तितकी सोपी करत असून, या अपघातातील मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत मृत्यू प्रमाणपत्राऐवजी केंद्र, राज्य सरकार आणि एअरलाइनने दिलेला कोणताही पुरावा स्वीकारला जाईल.

विमान अपघातात 265 लोकांचा मृत्यू
एअर इंडियाच्याअहमदाबादहून लंडनला जाणार्या एआय-171 विमानाचा गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर विमान लगेच कोसळले. या अपघाता विमानातील 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 र्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. याशिवाय, ज्या भागात विमान कोसळले, त्या भागातील सुमारे 55 लोकांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सरकारने उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले आहेत.
