अहमदाबाद विमान अपघात : मृतांची संख्या 275 वर

Ahmedabad plane crash: Death toll rises to 275 अहमदाबाद (14 जून 2025) : अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्ये ओढवला आहे.
अपघाताच्या वेळी, विमान कोसळलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीत 60 हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी आणि काही इतर लोक उपस्थित होते. यापैकी 34 जणांचा मृत्यू झाला असून आजअखेर मृतांची संख्या 275 झाली आहे. विमानातील 241 प्रवाशांसह 34 वैद्यकीय महाविद्यालयातील लोकांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे विमान अपघातातून केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

आतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 270 हून अधिक मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याशिवाय 220 जणांचे डीएनए सॅम्पलिंग करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी घटनेच्या ठिकाणाला भेट दिली. त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे त्यांनी सुमारे 10 मिनिटे पीडितांची भेट घेतली.
विमान अपघाताची चौकशी 8 एजन्सी करत आहेत, ज्यात राष्ट्रीय तपास संस्था, गुजरात पोलिस, विमान अपघात तपास ब्युरो, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा, युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश आहे.
