बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळात उद्या निवड चाचणी


Selection test for Baseball Championship tomorrow in Bhusawal भुसावळ (14 जून 2025) : 11 वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी रविवार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

18 वी वरिष्ठ राज्य पुरुष आणि महिला बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा 20 ते 22 दरम्यान अमरावती येथे होत आहे. ही स्पर्धा संत गाडगे महाराज विद्यापीठात पार पडेल. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ सहभागी होण्यासाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी दि बेसबॉल असोसिएशन जळगाव जिल्हा निवड समितीने जिल्हा निवड चाचणीचे आयोजन केले आहे. जिल्हा संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप साखरे यांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पुरुष आणि महिला खेळाडूंनी चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. खेळाडूंनी स्वतःचे ग्लोव्हज, बॉल व इतर आवश्यक साहित्यासह वेळेवर उपस्थित रहावे.


अधिक माहितीसाठी डॉ.प्रदीप साखरे (7020358118), मनोज वारके (9423189486), अजय देशमुख (09890446861) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा बेसबॉल संघटनेच्या वतीने आवाहन केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !