केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह सात प्रवाशांचा मृत्यू

Seven passengers including pilot killed in helicopter crash near Kedarnath केदारनाथ (15 हून 2025) : केदारनाथ मंदिरातून गौरीकुंडला भाविकांना नेत असलेल्या हेलिकॉप्टरला रविवारी पहाटे 5.20 वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे अपघात घउला. या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका दोन वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत वणी, यवतमाळ येथील जैस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणानुसार, हेलिकॉप्टरमध्ये उत्तर प्रदेश-महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 आणि उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी 1 प्रवासी होता. गौरीकुंड येथून एनडीआरएफ व एसडीआरएफची बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेलिकॉप्टर सेवेवर बंदी
चारधाम यात्रा हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले- हेली सेवेच्या संचालनासाठी कठोर एसओपी तयार केली जाईल. यामध्ये, उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती तपासणे आणि हवामानाची अचूक माहिती घेणे बंधनकारक केले जाईल.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.
