मोठी बातमी : भुसावळात दोघांवर हद्दपारीची कारवाई : प्रांताधिकार्यांचे आदेश

Big news : Deportation action against two in Bhusawal : Provincial authorities order भुसावळ (15 जून 2025) : सामाजिक शांततेता अडसर ठरू पाहणार्या दोघांवर भुसावळचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी अनुक्रमे एक वर्ष व सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पहिल्या प्रकरणात शाकीर उर्फ गोलू शेख रशीद (29, रा. विवेकानंद शाळेमागे, खोली नं. 32, भुसावळ) याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1)(अ)(ब) अंतर्गत कारवाई करत, त्याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. संबंधिताला जिल्ह्यातून रस्ते अथवा रेल्वे मार्गाने बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाच्या कालावधीत, त्याला उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
दुसर्या प्रकरणात, शेख सलीम शेख हमीद (58, रा.पापानगर, भुसावळ) याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले त्याच्यावरही कलम 56 (1)(अ)(ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यालाही तत्काळ जिल्ह्याबाहेर पाठवण्याचे आदेश दिले आहे. या दोन्ही हद्दपार इसमांनी जर आदेशाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याबाहेर वास्तव्य केल्यास, त्यांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दर महिन्याला आपला सविस्तर पत्ता नोंदवणे बंधनकारक आहे. राज्याबाहेर निघून जाताना व राज्यात परत आल्यानंतर 10 दिवसांच्या आत जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये माहिती देणे आवश्यक आहे. दोन्ही जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
