चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू : एकजण जखमी

Three killed, one injured in lightning strike in Chalisgaon taluka चाळीसगाव (15 जून 2025) : चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे रविवारी दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. लखन दिलीप पवार (14, कोंगानगर), दशरथ उदल पवार (24, रा.कोंगानगर) व समाधान प्रकाश राठोड (9, रा.जेहूर, ता.कन्नड, जि. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेततर या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (35) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चाळीसगाव, तहसीलदार चाळीसगाव, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी शासकीय रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना धीर दिला. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.
