अहमदाबाद विमान अपघात : माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले

Ahmedabad plane crash : DNA of former Chief Minister Vijay Rupani matched अहमदाबाद (15 जून 2025) : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या अपघातातील मृतांची संख्या 275 वर पोहोचली आहे. रविवारी सकाळपर्यंत 248 मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. त्यापैकी 31 मृतदेह जुळले आहेत, त्यापैकी 20 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. त्यांचे मृत्यु प्रमाणपत्रदेखील देण्यात आले आहे.
रुग्ण वाहिकांद्वारे मृतदेह सुरक्षिततेसह त्यांच्या गावी नेले जात आहेत. यासाठी 230 पथके तयार करण्यात आली आहेत, जी मृतांच्या नातेवाईकांशी थेट संपर्कात आहेत. 192 रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज आहेत. अपघातात प्राण गमावलेल्या 11 परदेशी नागरिकांचे नातेवाईक अहमदाबादला पोहोचू शकतात.

मृतदेह ठेवण्यासाठी 170 शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे 100 शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला आणण्यात आल्या आहेत. उर्वरित शवपेट्या बनवण्याचे काम सुरू आहे.
अहमदाबाद विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विमान उड्डाणानंतर 49 सेकंदांनी कोसळल्याचे दिसून आले.
अहमदाबाद विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विमान उड्डाणानंतर 49 सेकंदांनी कोसळल्याचे दिसून आले.
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात, विमानाचा पायलट सुमित सभरवालने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला पाठवलेला शेवटचा संदेश उघड झाला आहे. 4-5 सेकंदाच्या संदेशात, सुमित म्हणत आहेत, ’मेडे, मेडे, मेडे…
