भुसावळात बालवाडीत बसण्याच्या कारणावरून युवकास मारहाण

घरात घुसून काकालाही मारले


भुसावळ (16 जून 2025) : शहरातील शिवाजी नगर परिसरात बालवाडीत बसण्यावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरात घुसून त्याच्या काकासही लोखंडी आसार्‍याने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 जून रोजी रात्री 10.15 च्या सुमारास मारहाणीची घटना घडली. गुलाम मोहम्मद शेख बिस्मीला (27, रा. आगाखान वाडा, शिवाजीनगर, भुसावळ) यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुलाम मोहंमद शेख बिस्मीला हे बालवाडीसमोर बसले असता संशयीतांनी यहाँ बैठने का नही, तेरे बाप की बालवाडी नही है असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली. फिर्यादीने ही बालवाडी सरकारी असल्याचे सांगितल्यावर संशयीत संतापले आणि त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथून पळून फिर्यादी घरी गेले. त्यानंतर काही वेळातच सहा जण घरात घुसले. घरातील वस्तूंची तोडफोड करून गुलाम शेख बिस्मीला यांचे काका गुलाम दस्तगिर शेख रोशन यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर लोखंडी आसार्‍याने डावे आणि उजवे हातावर हल्ला करण्यात आला. तसेच तेरा भतीजा जहाँभी मिलेगा उसे मार डालेगा अशी धमकीही देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणात अहमद इब्राहिम कुरेशी, सुलतानाबी कुरेशी, साहिल मुशीर शेख, गुड्डी शेख मुशीर, नसिम शेख सलिम आणि शमाबी हफीज (सर्व रा.शिवाजीनगर, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार परिष जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !