भुसावळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान
आई दादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती-मोर्चातर्फे उपक्रम

Initiatives by Ai Dada Pratishthan and BJP Scheduled Caste Morcha भुसावळ (16 जून 2025) : छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रविवार, 15 जून रोजी आई दादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चा, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक क्षण गौरवाचा 2025’ सन्मान सोहळा शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, क्रीडा, साहित्य, कला, व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या प्रत्येक क्षेत्रातील 50 मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.
मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत उपक्रम
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे होते. त्यांच्या हस्ते गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ‘एक क्षण गौरवाचा 2025’ या उपक्रमातून भुसावळ परिसरातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिक्षक, क्रीडापटू, साहित्यिक, व समाजसेवक यांचे योगदान ओळखून त्यांना समाजात नवे बळ व प्रोत्साहन देण्याचा उद्देश यशस्वीपणे पूर्ण झाला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, भाजप शहराध्यक्ष किरण कोलते, संदीप सुरवाडे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, गोलू पाटील, खुशाल जोशी, अनुसूचित जाती-मोर्चा जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे, शैलजा पाटील, चेतना भिरुड, धनराज बाविस्कर, राजू खरारे, रवींद्र ढगे, अॅड.तुषार पाटील, अनिरुद्ध कुलकर्णी, विशाल नाटकर, वरुण इंगळे, चेतन जैन, अमित असोदेकर, गोपीसिंग राजपूत, विजय साळवे, रहेमान शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राहुल वसंत तायडे, भुसावळ शहर पदाधिकारी प्रेमचंद तायडे, संतोष ठोकळ, रवींद्र दाभाडे, विशाल सोयंके, राहुल बिर्हाडे, विक्की गोहर, गणेश जाधव, राकेश सपकाळे, दीपक गायकवाड, नरेश खंडारे, दीपक सोनवणे, दिनेश बालूरे, आकाश आव्हाड, भरत उमरिया, संजय नरवाडे, रवी घुले, वाल्मिक पवार, अश्विन नरवाडे, अजय तायडे यांच्यासह संजीवनी महिला मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.
