भुसावळातील हॉटेल चालकाला चाकू व तलवार लावत मारहाण करीत लूटले

कुविख्यात तस्लीम काल्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा : त्रिकूटाला अटक


Hotel owner in Bhusawal beaten and robbed with knife and sword भुसावळ (16 जून 2025) : शहरातील रजा टॉवर भागातील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर हॉटेल मालकाने बिल मागितल्याच्या रागातून आरोपींनी चाकूसह तलवार दाखवत हॉटेल चालकासह कुटूंबाला शिविगाळ करीत मरहाण करून पाच हजार रुपये लूटण्यात आले. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी कुविख्यात तस्लीम काल्यासह नऊ आरोपींविरोधात दरोड्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण
रोशन होलाराम सचदेव (40, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचे रजा टॉवरजवळ अंगारा नावाचा ढाबा आहे. शनिवार, 14 जून रोजी दुपारी 4.30 वाजता रोशन सचदेव हे दुकानावर असताना ग्राहकांना जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून संशयित आरोपी शेख नईम शेख सलीम, तसलीम उर्फ काल्या सलीम शेख, वसीम शेख सलीम शेख, शेख सलीम शेख सिकंदर, आशु बबलू ठोंबरे, आकाश अशोक लोंढे, आदिल खान शोएब खान, शेख वसीम उर्फ शेख चांद आणि आरान शेख वसीम (सर्व रा.भुसावळ) यांनी चाकू काढून हमे पहेचानता नहीं क्या, तुम्हे मार डालेंगे म्हणत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी शेख नईमने पोटाला चाकू लावत शर्टाच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले व त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराची पत्नी सोनी आणि मुलगा आदित्य यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली.


तलवार दाखवत कुटूंबाला संपवण्याची धमकी
आरोपी शेख सलीम शेख सिकंदर याने तलवारीद्वारे दहशत निर्माण करीत साले मेरे आदमी लागोसे खाने के पैसे मांगता है, तुझे और ते परिवार को छोडूंगा नहीं, अशी धमकी दिली.

रोशन सचदेव यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेत आपबिती सांगितल्यानंतर रविवारी नऊ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. यातीन तीन आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !