कजगावातील नेहा ललवाणी ‘कम्प्युटर इंजिनिअरिंग’मध्ये द्वितीय

Neha Lalwani कजगाव, ता.भडगाव (20 जून 2025) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या 2025 च्या परीक्षेत चांदवड येथील नेमीनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल जैन तंत्रनिकेतनच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्ष परीक्षेत कजगाव, ता.भडगाव येथील नेहा स्वप्नील ललवाणी हिने 92.71 गुण मिळवत व्दितीय क्रमांक पटकावला.
तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती कजगाव येथील नवकार मेडीकलचे संचालक स्वप्नील ललवाणी यांची कन्या तर कजगाव े ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी यांची नात आहे.
