मेडिकलच्या नीट परीक्षेत अनुष्का पाटीलचे घवघवीत यश


Anushka Patil रावेर (20 जून 2025) : रावेर येथील मॅक्रोव्हिजन अकॅडमीची विद्यार्थिनी अनुष्का जितेंद्र पाटील (भुसावळ) हिने नुकत्याच मेडिकलसाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत 568 गुणांसह (99.72 पर्सेंटाइल्स) आय.आर.5863 आणि ओबीसी 2344 रँक सहीत व 12 वी विज्ञान शाखेत 92 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. ती शाळेमध्ये द्वितीय आणि मुलींमध्ये प्रथम आली. तिला शाळेचे शिक्षक व आई-वडिलांचे मार्गदर्शन मिळाले.

दीपनगर येथील महाजेनकोचे (एम.एस.ई.बी.) अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे पी पाटील आणि कोथळी आश्रमशाळोच्या शिक्षिका माधुरी नामदेव पाटील यांची ती कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !