विषारी द्रव्य प्राशन केलेल्या नायगाव येथील 35 वर्षीय तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू


35-year-old youth from Naigaon dies during treatment after consuming poisonous substance यावल (20 जून 2025) :  यावल तालुक्यातील नायगाव या गावातील रहिवाशी एका 35 वर्षीय तरुणाने 11 जून रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णाला दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय घडले नेमके
नायगाव, ता.यावल या गावातील रहिवासी धनराज दिलीप पाटील (35) या तरुणाने आपल्या राहत्या घरी बुधवार, 11 जून रोजी कसलेतरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना सोमवार, 16 जून रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार वसंत बेलदार करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !