भुसावळातील मेहता विद्यामंदिरात योग दिन उत्साहात


Yoga Day celebrated with enthusiasm at Mehta Vidya Mandir in Bhusawal भुसावळ (21 जून 2025) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक दीपक तेली यांनी विविध योगासने केली.

ताडासन, वृक्षासन नौकासन, त्रिकोणासन, भुजंगासन, सुखासन, बालासन, सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, प्राणायाम इत्यादी विविध योगासने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्तम प्रकारे योगासने केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकी योगासन करताना योगासनाचे महत्त्व सांगितले. व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियमित योगासने केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !