भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात


International Yoga Day celebrated with enthusiasm at Biyani School in Bhusawal भुसावळ (21 जून 2025) : शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यमात शनिवार, 21 रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता मनोज बियाणी, आयुषी बियाणी, सहज योग ध्यान केंद्रातील सदस्य किरण ठाकूर, संतोष पाटील, महेश कुळकर्णी, जी.आर.बडगुजर, नरेंद्र नेमाडे, मनीष मोटवाणी यांच्यासह शाळेच्या प्रिंसीपल रुद्रसेन गांठिया, अलीना खान उपस्थित होते.

डॉ.संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले. तसेच प्राणायाम, ध्यान केल्याने होणारे फायदे, सूर्य नमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम प्रकार आहे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. सहज योग ध्यान केंद्रातील सदस्यांनी विविध पद्धतीने ध्यान कसे करावे त्याचे स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. सर्व मुलांनी अगदी उत्साहात वॉर्म अप, विविध आसने, प्राणायाम केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी रोज ध्यान करण्याचा संकल्प केला. शाळेच्या प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया यांनी आभार मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !