मोहराळ्यातील तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह : घातपाचा संशय


Body of a young man found in a well in Moharala : Murder suspected यावल (21 जून 2025) : यावल तालुक्यातील मोहराळा गावातील 19 वर्षीय तरूणाचा शुक्रवारी शेतविहिरीत मृतदेह आढळला. कुटुंबाने मात्र घातपात झाल्याचा संशय वर्तवला आहे. गावातील काही जणांना चौकशीकरीता ताब्यात घेण्यात आले असुन रात्री मृतदेह विहिरीतून काढण्यात आला आहे. गावात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना
मोहराळेतील रहिवासी साहिल शब्बीर तडवी (19) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी मोहराळा गावापासून वड्रीकडे जाणार्‍या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेत-विहिरीत मिळून आला. हा तरूण सोमवारपासून बेपत्ता होता. तरूणाच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. गावात एका चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलिस हवालदार वासुदेव मराठे, हवालदार सुनील पाटील, अमित तडवी हे पथकासह दाखल झाले व गावातील एका कुटुंबातील काही जणांना चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. रात्री सव्वा आठ वाजेला शेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. कुटुंबियांनी इन कॅमेरा शव विच्छेदनाची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !