योग हा निरोग राहण्यासाठी करावा : भुसावळात प्राचार्य डॉ.रमेश जोशी

Yoga should be done to stay healthy : Bhusawal Principal Dr. Ramesh Joshi भुसावळ (21 जून 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगशिक्षक डॉ.प्रवीण जाधव यांनी विविध आसने, योगासन, व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून घेतले.
विद्यार्थ्यांनी या दिवशी आपला मोठा सहभाग नोंदवला तसेच प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सर्वांना सांगितले की योग हा निरोग राहण्यासाठी करावा. दररोज एक तास योगासन करणे खूप आवश्यक आहे. स्वस्थ जीवन शैलीसाठी योगासनाचे महत्त्व खूप आहे. आजच्या जीवनात अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. दीर्घायुष्य व निरोगी जीवन प्राप्त करण्यासाठी योगासने करावी, अशी माहिती देऊन योग दिवसाचे महत्व त्यांनी पटवून दिले. योगासनामध्ये प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती व सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ.सुधीर शर्मा, डॉ. विवेक जोशी, प्रा. हितेश गुप्ता. प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.समता तायडे, प्राध्यापक गणेश घोडेकर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
