भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये योग दिन उत्साहात

Yoga Day in full swing at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (21 जून 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शनिवार, 21 रोजी योग दिन व योगा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये 17 ते 21 पर्यंत योग सप्ताह साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योगाचे आसन प्राणायामचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योग तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
इयत्ता आठवी ते नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर, व्हाईस प्रिन्सिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, शिक्षिका सोनाली मुजुमदार, योग शिक्षिका अनघा पाटील, वृषाली गाडगीळ यांच्यासह शिक्षकेतर कर्मचार्यांनी योग सादर करीत प्राणायाम केले.
