भुसावळात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी स्वागताने भारावले
भुसावळ (21 जून 2025) : विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढलेली सुबक रांगोळी, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट, फलकावर लिहिलेला स्वागतपूर्ण संदेश अशा वातावरणात भुसावळात सेंट अलॉयसीस शाळेत चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.
19 जून रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण होते. गणवेशात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत कुठे फुल देऊन तर कुठे औक्षण करून केले जात होते. शाळांच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


भुसावळ शहरातील नामांकीत अशा सेंट अलॉयसीस शाळेतील ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे भुसावळ शहर सरचिटणीस श्रेयस शेखर इंगळे व मित्र परिवारातर्फे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.






